खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती"

परदेशातील उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” सुरु करण्यात आली आहे. ही योजना शासन शुध्दीपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक शिष्यवृ-2024 /प्र. क्र.243/तांशि-4, दि.06 ऑगस्ट 2024 च्या सुधारित निकषाप्रमाणे राबवली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून https://dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील Foreign Scholarships Portal वरून दरवर्षी online पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात.

पात्रता:
  • विद्यार्थी व त्याचे पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी: भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • Ph.D अभ्यासक्रमासाठी: भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण.
  • विद्यार्थ्याला QS World Ranking मध्ये 200 च्या आत असलेल्या संस्थेमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
  • Unconditional Offer Letter आवश्यक.
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी.
  • 1 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा: पदव्युत्तरसाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
उपलब्ध जागा (शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून):
अ. क्र. शाखा / अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी व पदविका डॉक्टरेट एकूण
1 कला 03 01 04
2 वाणिज्य 03 01 04
3 विज्ञान 03 01 04
4 व्यवस्थापन 03 01 04
5 विधी अभ्यासक्रम 03 01 04
6 अभियांत्रिकी / वास्तुकला शास्त्र 12 04 16
7 औषधनिर्माणशास्त्र 03 01 04
एकूण 30 10 40
विद्यार्थ्यांस मिळणारे लाभ:
  • विद्यापीठाने नमूद केलेले पूर्ण शिक्षण शुल्क (Tuition Fee).
  • वैयक्तिक आरोग्य विमा रक्कम संपूर्ण.
  • शासन दरानुसार निर्वाह भत्ता:
    • UK साठी: GBP 9900
    • इतर देशांसाठी: USD 15400
  • इतर खर्च / आकस्मिक खर्च:
    • USA / इतर देश: USD 1500
    • UK: GBP 1100
  • फक्त एकदाच जवळच्या मार्गाने येण्या-जाण्याचा इकॉनॉमी क्लास विमान प्रवास खर्च.
हेल्पलाईन नंबर:

सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 पर्यंत

022-68597496 / 459 / 421