महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठासह), विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतनामध्ये सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी “शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना” सन 2006-07 पासून लागू केली.
• शिष्यवृत्ती रक्कम – सदर योजनेंतर्गत विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल, त्या अभ्यासक्रमाकरिता आकारण्यात येणारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रकमेच्या लाभ मुले / मुलींना खालील प्रमाणे देण्यात येतो. | ||||||
---|---|---|---|---|---|---|
अ. क्र. | प्रकार | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा | अभ्यासक्रम | विद्यार्थी | शैक्षणिक शुल्काच्या | परीक्षा शुल्काच्या |
1 | शिष्यवृत्ती | 8 लाखा पर्यंत | व्यावसायिक | मुले | ५० टक्के | ५० टक्के |
2 | शिष्यवृत्ती | 8 लाखा पर्यंत | व्यावसायिक | मुली | १०० टक्के | १०० टक्के |
शिष्यवृत्ती अर्ज करण्याची प्रक्रिया:
पात्र विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in) वर ऑनलाईन अर्ज करावा.