Regional Directorate of Technical Education,Amravati
अ. ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे. वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :.
महानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी रुपये 3000/- राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी रुपये 2000/-

ब. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकाांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांकरिता रु. ३०००/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येईल .

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना व इतर शिक्षण शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी पोर्टलमधून काढण्याबाबत.

अधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे.

टीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.